Maharashtra Bhushan : "माझ्या कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला तेव्हा…"; मुख्यमंत्री शिंदेंचं भावनिक वक्तव्य

CM eknath shinde  onappasaheb dharmadhikari honored maharashtra bhushan award ceremony shri members
CM eknath shinde onappasaheb dharmadhikari honored maharashtra bhushan award ceremony shri members

ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (१६ एप्रिल) राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला तेव्हा आप्पासाहेबांनीच त्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखादरम्यान आप्पासाहेबांनी त्यांना केलेल्या मदतीची आठवण उपस्थितांना सांगितली.

सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित तसेच शिवसेना-भाजपचे अनेक नेते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

CM eknath shinde  onappasaheb dharmadhikari honored maharashtra bhushan award ceremony shri members
Maharashtra Bhushan: ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, धर्माधीकरी घराणं लोकांना दिशा देण्याचं काम करत आहे. लाखो उद्धवस्त आणि भरकटलेल्या कुटुंबाना दिशा देण्याचं काम आपासाहेब, नानासाहेबांनी केलं आणि सचिन दाद पुढे नेत आहेत. मी एवढंच सांगेन की, या लाखो कुटुंबात माझंही एक कुटुंब होतं. माझ्या कुटुंबावर जेव्हा दुखःचा डोंगर कोसळला, कुटुंब उद्धस्त झालं तेव्हा मला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यात आधार दिला आणि आप्पासाहेबानी माझ्या संपूर्ण कुटुंबाला या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन करायला दिशा दाखवली.

CM eknath shinde  onappasaheb dharmadhikari honored maharashtra bhushan award ceremony shri members
Ajit Pawar: वज्रमुठ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत; स्वतःच केला खुलासा

आप्पासाहेबांनी दिशा दाखवली म्हणूनच मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक श्री सदस्य म्हणून उभा आहे. यामध्ये यामध्ये आप्पासाहेबांचं मोठं योगदान आहे जे मी कधीही विसरू शकत नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. समोर बसलेल्या गर्दीला उद्देशून बोलताना पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लाखो कुटुंब उद्धस्त होत असताना त्यांना वाचवण्याचं काम आप्पासाहेबांनी केलं म्हणूनच हा महासागर या ठिकणी पसरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com