
CM एकनाथ शिंदेंच्या कॉलमुळे MPSC च्या ४०० जागा वाढणार
पुणे : मुख्यमंत्र्यांना केलेल्या एका कॉलमुळे राज्यसेवेच्या ४०० जागांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यातील एका विद्यार्थ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट मोबाईलवर केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. (CM Eknath Shinde)
राज्यसरकारच्या विविध विभागांनी मागणीपत्र दाखल न केल्यामुळे, राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेतील जागांची संख्या कमी होती. केवळ सहा विभागातील १६१ जागांचे परिपत्रक काढण्यात आले होते. उर्वरित विभागाचे मागणीपत्रच सामान्य प्रशासन विभाग अथवा एमपीएससी ला मिळाले नाही. (MPSC Latest Update) अपुऱ्या जागा आणि पुढील वर्षी बदललेल्या अभ्यासक्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांची संधी हुकणार आहे, अशी माहिती ललित पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून दिली. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागणीची तातडीने दखल घेत, संबंधित विभागाला निर्देश दिले असून, सुमारे ४०० जागांमध्ये वाढ होणार असल्याचे कळविण्यात आले आहे, असे पाटील सांगतात.
Web Title: Cm Eknath Shinde Phone Call Mpsc Exam 400 New Vacancies Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..