
CM शिंदेंची 'नायक स्टाईल' कारवाई, दोन डॉक्टरांचे तडकफडकी निलंबन
कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी कारवाई केली आहे. रुग्णालयात जाऊन चौकशी केल्यानंतर सोयी-सुविधांचा अभाव असल्याचं लक्षात आलं. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही डॉक्टरांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं. (CM Eknath Shinde suspends two doctors thane )
ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता डाॅ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई शनिवारी करण्यात आली.
Kasaba Vidhansabha Byelection : कसब्याने दिला भाजपच्या आमदारांना धोक्याचा इशारा
रुग्णालयातील डाॅक्टरांच्या वसतीगृहाच्या दुरावस्थेस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्यानंतर आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने ही कारवाई केली.
नेमकं काय आहे प्रकरण?
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुसज्ज प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रीया विभाग तयार करण्यात आला असून त्याचबरोबर रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालय उभारण्यात आलेले आहे. या प्रकल्पांचे शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांच्या वसतीगृहाच्या दुरावस्था असल्याची बाब मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आली होती. याशिवाय, तेथील महिला डॉक्टरांनी या दुरावस्थेसह त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या तक्रारी करताच मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये डॉक्टर चांगले काम करीत आहेत. पण, रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या वसतीगृहाची परिस्थिती चांगली नाही. यासाठी जे जबाबदार अधिकारी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेशही त्यांनी दिले.
या आदेशानंतर आयुक्त बांगर यांनी तातडीने महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.