
Uddhav Thackeray : ठाकरे गटासाठी उद्या महत्त्वाचा दिवस; 'या' तीन मुद्द्यांवर होणार सुनावणी
मुंबईः परवा निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या नाव आणि चिन्हासंदर्भात सुनावणी झाली. आयोगाने १७ जानेवारी रोजीची पुढची तारीख दिली होती. आता उद्या ठाकरे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे.
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाली एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षावर दावा केल्याने केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावण्या सुरु आहेत.
शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या सुरु आहेत. तर शिवसेना पक्षचिन्ह आणि नावासंदर्भात निवडणूक आयोगाकडे सुनावण्या सुरु आहेत. परवा महत्त्वाची हेरिंग झाली. त्यानंतर आयोगाने उद्याची तारीख दिली होती.
हेही वाचा: NCP News : प्रदीप सोळुंके यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; पक्षाकडून 'हा' उमेदवार रिंगणात
उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या पक्षप्रमुख पदाबाबतही पेच निर्माण झाला आहे. ठाकरेंचा पाच वर्षांचा कार्यकाळ २३ जानेवारी २०२३ रोजी संपत आहे. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्यावरही उद्या निर्णय येण्याची शक्यता आहे.
निवडणूक चिन्ह, पक्षाचं नाव आणि पक्षप्रमुखपदाचा पेच यावर काय निर्णय येतो, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. आमचीच खरी शिवसेना, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. दोन्ही गटांनी ट्रकच्या ट्रक भरुन पुरावे आयोगाकडे सादर केलेले आहेत.