Eknath Shinde to Ayodhya: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा ठरला; 'या' दिवशी जाणार रामलल्लाच्या दर्शनाला

CM Eknath Shinde performs Maha Aarti at the banks of Sarayu River in Ayodhya Uttar Pradesh
CM Eknath Shinde performs Maha Aarti at the banks of Sarayu River in Ayodhya Uttar Pradesh

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २२ जानेवारीला अयोध्येला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नव्हते. पण आता त्यांना अयोध्या दौरा निश्चित झाला असून फेब्रुवारीमध्ये ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. (cm eknath shinde visit to ayodhya is scheduled will go to ramlalla darshan on february first week)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचं मंत्रिमंडळच रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. यामध्ये गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांचाही समावेश असणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा दौरा जाणार असला तरी अद्याप या दौऱ्याची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे, त्यानंतरचीच तारीख निश्चित केली जाऊ शकते. (Marathi Tajya Batmya)

CM Eknath Shinde performs Maha Aarti at the banks of Sarayu River in Ayodhya Uttar Pradesh
Congress on Mamata Banerjee: "ममतांशिवाय इंडिया आघाडीचा विचारच होऊ शकत नाही"; काँग्रेसकडून डॅमेज कन्ट्रोलचा प्रयत्न

दरम्यान, २० जानेवारी रोजी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्याचवेळी त्यांनी लवकरच दौऱ्याबाबतची तारीख जाहीर करु असंही म्हटलं होतं. त्यानुसार, आता हा सोहळा पार पडल्यानंतर अयोध्या भेटीचा संभाव्य कालावधी जाहीर करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

जय श्री राम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अब्जावधी भारतीयांचे, रामभक्तांचे तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामाच्या भव्य मंदिराचा अभिषेक केला जाणार आहे. मी महाराष्ट्रातील जनतेच्यावतीनं पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो.

या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केलं आहे. माझ्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार असतील. संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्तांना सोबत घेऊन भगवान श्रीरामाचे दिव्य दर्शन घेण्याचे आम्ही ठरवले आहे. अयोध्येत दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवू!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com