
CM Devendra Fadnavis: राज्यात सप्टेंबर महिन्यात कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, घरं कोसळली, जनावरं दगावली तर कित्येकजण आजही पुरामध्ये आहेत. अशा बाधित शेतकऱ्यांना सरकार मदत जाहीर करणार आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मदत जाहीर करताना सरकार कुठलेही निकष लावणार नाही,अशी सूत्रांची माहिती आहे.