
Maharashtra Development
Sakal
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथिगृहावर १ लाख ८ हजार ५९९ कोटी रुपयांच्या पाच सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. डेटा सेंटर, पॉलिमर उत्पादने, कोल गॅसिफिकेशन क्षेत्रातील या उद्योगांतून सुमारे ४७ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्यात गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ३४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले होते. मागील पंधरा दिवसांत आज दुसऱ्यांदा मोठी गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक कोकण, नाशिक व विदर्भ विभागांत होणार आहे.