Karad : कोणीही पंढरपूरला येऊ शकतं, पण तिथं येऊन राजकारण करु नये; उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी येणार असल्याची घोषणा केलीये.
K Chandrasekhar Rao Devendra Fadnavis
K Chandrasekhar Rao Devendra Fadnavisesakal
Updated on
Summary

कोणालाही पंढरपुरला येता येईल. तिथं सर्वांचं स्वागत आहे. मात्र, राजकारणासाठी कोणी येवू नये.

कऱ्हाड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी येणार असल्याची घोषणा केलीये. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात कोणीही येऊ शकतं.

तिथं भक्तीभावानं या, पण राजकारणासाठी कोणी येऊ नये, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री राव यांना लगावला. उपमुख्यमंत्री फडणवीस काल (गुरुवार) कऱ्हाडच्या (जि. सातारा) दौऱ्यावर होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

K Chandrasekhar Rao Devendra Fadnavis
Satara : माझ्या जागेत पाय ठेवाल तर तंगडे तोडणार; उदयनराजेंचा थेट शिवेंद्रराजेंना इशारा

खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले आदी उपस्थित होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत.

K Chandrasekhar Rao Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : उदयनराजे-शिवेंद्रराजे वादावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, तिथं गंभीर घडलं असं..

त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, कोणालाही पंढरपुरला येता येईल. तिथं सर्वांचं स्वागत आहे. मात्र, राजकारणासाठी कोणी येवू नये. भक्तीभावाने तिथं आलं पाहिजे. त्या भावनेनं तिथं कोणीही येत असेल तर त्यांचं तिथं स्वागतच आहे, असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

45-Day Spiritual Journey Begins: Sacred Bullock Pair to Lead Sant Eknath Maharaj’s Palkhi
Malhar Rao Holkar's Reign Documented
Pandharpur farm pump electrocution accident
Aman Rao Perala fastest century in Telangana T20 League
Marathi News Esakal
www.esakal.com