
पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबई : राज्यात सध्या पावसाने जोर धरला असून प्रशासनाकडून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान दोन वर्षानंतर सुरू झालेल्या वारीसाठीही त्यांनी उपाययोजना केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नागरिकांच्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी शासनाकडून घेण्यात आली आहे.
(CM Eknath Shinde On Pandharpur Wari)
त्याचबरोबर कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
हेही वाचा: राऊत बोलले अन् बंडाची ठिणगी पडली; शहाजी पाटलांनी सांगितली कहाणी
वारकरी दिंड्यांवर जास्त फोकस करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच यासाठी निधी कमी पडणार नाही असंही ते म्हणाले आहेत. यावेळी बोलतना त्यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोल फ्री करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि वारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या ४ हजार ७०० बस सोडण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
वारकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घेण्यात आली आहे त्यामुळे यावर्षीची वारी यशस्वी होणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये पोलिसांची महत्वाची भूमिका असते असं म्हणत त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
Web Title: Cm Shinde Pandharpur Wari Vehicle Toll Free Announcement
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..