मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्लीतील मुक्काम वाढला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde

मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्लीतील मुक्काम वाढला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक दिवशीय दिल्ली दौरा नियोजित होता. आणि त्या नंतर दौरा पुर्ण करून बुधवारी ते मुबंईत परतणार होते. परंतु शिंदे यांचा दौरा अचानक वाढल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मात्र एक मुक्काम वाढला असला, तरी गुरुवारी कोणतीही महत्वाची बैठक किंवा चर्चा झाली नाही.

गुरूवारी सकाळी बातम्या येत होत्या की मुख्यमंत्री शिंदे मोदींना भेटणार आहेत. परंतु या बातम्या शिंदे गटाने फेटाळल्या होत्या. त्यांनी स्पष्ट केलं होत की अशी कोणतीही भेट होणार नाही. गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये वकिलांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांनी काही केंद्रीय मंत्र्यांशी फोन वरून चर्चा केली आहे.

हेही वाचा: अखेर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी? मुख्यमंत्री शिंदे काय घेणार निर्णय

त्या मध्ये हरदीप सिंह पुरी, गिरिराज सिंह, अश्विनी वैष्णव, या मंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्यांनी कोणाचीही व्यक्तीक जावून भेट घेतली नाही. त्या मुळे मुख्यमंत्र्यांचा एक दिवस मुक्काम वाढल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर प्रथमच जाहीर सभेतून संबोधीत केले. त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टिका केली होती. त्या टिकेला एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत एका कार्यक्रमातून ठाकरे यांना जोरदार प्रतिउत्तर दिले होते.

Web Title: Cm Shinde Stay Delhi Extended Inciting Discussions Political Circles

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CM Eknath Shindedelhi