सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस दिल्ली दरबारी; अमित शहांची प्रथमच घेतली उघड भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस दिल्ली दरबारी; अमित शहांची प्रथमच घेतली उघड भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्रात दहा दिवसांच्या सत्तानाट्यानंतर शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीस (Devendta Fadnavis) यांनी महाराष्ट्रात आपलं सरकार स्थापन केलं आणि पहिल्यांदाच ते दिल्ली दरबारी गेले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची मुर्ती भेट दिली आहे. (CM Eknath Shinde And PM Narendra Modi Meet)

शिंदे भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात ३० जून रोजी स्थापन झालं. शिंदे यांनी शिवसेनेला बंड करून काही आमदारांसहित गुवाहटी गाठलं होतं. त्यानंतर तब्बल १० दिवस महाराष्ट्रातील सत्तेचं नाट्य सुरू होतं. यावेळी शिंदे यांनी भाजपचे नेते अमित शहा यांच्या बडौदा येथे गुप्तपणे भेटी घेतल्याच्या चर्चा होत होत्या पण आता सत्ता स्थापन केल्यावर पहिल्यांदाच शिंदे यांनी शहा यांची उघडपणे भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत.

हेही वाचा: क्रॉस वोटिंग, सत्तापालट; काँग्रेस हायकमांडने मागवला राज्याचा अहवाल

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रात निर्णय घेण्याचा तगादा लावला आहे. त्यांनी मागच्या तीन चार दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. वारकऱ्यांच्या वाहनासाठी टोल फ्री, सांगली कोल्हापूरचे पाणी मराठवाड्यात वळवणार, आपत्ती व्यवस्थापना विषयी महत्त्वाचे निर्णय या सरकारकडून घेण्यात आले आहेत. तर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्ली वारी केली आहे. विशेष म्हणजे या भेटीत त्यांनी शहा यांना विठ्ठल रूख्मिणी यांची मुर्ती भेट दिली आहे.

दरम्यान पक्षाच्या चिन्हावरून आणि नावावरून झालेल्या वादावर दिल्लीत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे याआधीही एकदा कोर्टात गेले होते, पण कोर्टाने स्थगिती दिली नाही. न्यायालयावर आमचा विश्वास आहे, न्यायालय योग्य तो निकाल देईल, असे त्यांनी सांगितले. खरी शिवसेना कोणती?यावर बोलताना शिंदे म्हणाले की, शिवसेना पक्ष म्हणून सभापतींनी आम्हाला मान्यता दिलीय, आमच्याकडे 2/3 बहुमत आहे, यापेक्षा जास्त काही मला सांगायचे नाही, असे शिंदे यावेळी म्हणाले. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात पक्षाच्या नावावरून मोठा वाद टोकाला गेला आहे.

Web Title: Cm Sknath Shinde Devendra Fadnavis Meet Amit Shaha Gift Vitthal Idol

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top