esakal | मुख्यमंत्री ठाकरेंच्या सल्लागारावर आयकर विभागची नजर
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री ठाकरेंच्या सल्लागारावर आयकर विभागची नजर

मुख्यमंत्री ठाकरेंच्या सल्लागारावर आयकर विभागची नजर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजोय मेहता आयकर विभागाच्या रडारावर असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त अजोय मेहता यांचा नरिमन पॉईंट येथील फ्लॅटवर आयकर विभाग नजर ठेवून आहे. कधीही आयकर विभाग मेहता यांच्या बंगल्यावर धाड मारू शकते, अशी माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजोय मेहता यांनी नरिमन पॉईंट परिसरातील फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट शेल कंपनी अनामित्र प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या कंपनीचे दोन भागधारक आहेत. आता आयकर विभागाच्या रडारावर अजोय मेहता यांचा हा प्लॅट आहे.

जुलै 2020 पासून अजोय मेहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलं आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

loading image