
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य सुभाष देसाई, नवाब मलीक, अस्लम शेख व आदित्य ठाकरे उपस्थित होते.
मुंबई : भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी संध्याकाळी (ता. 26) राजभवनाच्या हिरवळीवर चहापानाचे आयोजन केले होते. राज्यपालांनी निमंत्रितांची भेट घेतली तसेच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य सुभाष देसाई, नवाब मलीक, अस्लम शेख व आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, लोकप्रतिनिधी, उद्योग विश्वातील राजश्री बिर्ला, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदांनी, विविध देशांचे राजनैयिक प्रतिनिधी, मुख्यसचिव अजोय मेहता, पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात व सांगता झाली.