esakal | वारकऱ्यांना दर महिना पाच हजार मानधन
sakal

बोलून बातमी शोधा

वारकऱ्यांना दर महिना पाच हजार मानधन

वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल असे यावेळी अमित देशमुख यांनी सांगितले.

वारकऱ्यांना दर महिना पाच हजार मानधन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - कोरोना काळामध्ये अडचणीत सापडलेल्या प्रत्येक वारकऱ्याला महिन्याला पाच हजार रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने केली. विधानभवनात बुधवारी झालेल्या संतपीठ बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली. वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले. वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल असे यावेळी अमित देशमुख यांनी सांगितले.

वारकरी साहित्य परिषदेने काही मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये वारकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन मिळावे, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य असे संतपीठ उभे रहावे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या मागण्या बैठकीत मांडल्या होत्या.

हेही वाचा: राज्यात एकाच दिवसात 14 लाखांपेक्षा अधिक लस मात्रा

सांस्कृतीक कार्य विभाग महाराष्ट्र शासन आणि वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र यांनी संतपीठा संदर्भात विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

loading image
go to top