esakal | उद्धव ठाकरेंचा संभाजीराजेंना फोन; पत्राची घेतली तात्काळ दखल
sakal

बोलून बातमी शोधा

Cm Uddhav Thackeray call Chatrapati Sambhaji Raje over Maratha Reservation

उद्धव ठाकरेंचा संभाजीराजेंना फोन; पत्राची घेतली तात्काळ दखल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला आत्ताच फोन आला. त्यांनी मला विश्वास दिला की कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण संबंधातील वकील बदलले जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत सांगितले आहे. मराठा आरक्षणाची केस पूर्वी प्रमाणेच पूर्ण ताकतीने लढवली जाईल. कुठेही कमतरता ठेवली जाणार नसल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संभाजीराजे म्हणाले, 'मराठा आरक्षण मिळवण्याकरिता समाजाने खूप मोठा त्याग केला आहे. अनेक दशकांपासून हा लढा चालू आहे. कित्येकांनी आपले बलिदान सुद्धा दिलं. आजही मराठा आरक्षणाची केस सर्वोच्च न्यायालयात लढवली जात आहे. मी स्वतः प्रत्येक तारखेला न्यायालयात उपस्थित राहत असतो. आज एक केस लागली असताना लक्षात आलं की मुकुल रोहतगी आणि नाडकर्णी या जेष्ठ वकिलांना बाजू मांडण्यास नाकारण्यात आले. मी तात्काळ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले. नवीन सरकारी वकील साहेब आले आहेत, त्यांनी काहीएक विचार करून यांना थांबवले, हे लक्षात आले. मी माझी चिंता व्यक्त केली.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत, यावर माझ्याशी संपर्क केला. आणि त्यांनी पूर्ण विश्वास दिला की मराठा आरक्षणाच्या संदर्भात कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही. त्यामुळे समाजाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो, आणि ते असेच सहकार्य करतील असा विश्वासही व्यक्त करतो, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

प्रियकराचे नशिब जोरात; सगळीकडून मालामाल

दरम्यान, राज्य सरकारकडे पैसे नसल्यामुळे मराठा आरक्षण केस चालवणा-या मुकूल रोहतगी यांना महाराष्ट्र सरकारने हटवले असल्याची माहिती काल (ता.१९) समोर आली होती. महागडे वकील असल्याचं कारण महाराष्ट्र सरकारने दिले होते. यावर खासदार संभाजीराजे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून स्पष्ट शब्दांत नाराजी कळविली होती, त्यावर उद्धव ठाकरे यांनी फोन करुन असे काही होणार नसल्याचा विश्वास संभाजीराजे आणि सकल मराठा समाजाला दिला आहे.