
प्रियकराचे नशीब आहे की काय? आमचे नशीब कुठे लपलेय काय माहिती. गर्लफ्रेण्ड मिळायलाही नशीब लागते. गर्लफ्रेण्ड बरोबर त्याला काय-काय मिळाले, या आहेत एका व्हिडिओवरील प्रतिक्रिया.
बीजिंग (चीन): प्रियकराचे नशीब आहे की काय? आमचे नशीब कुठे लपलेय काय माहिती. गर्लफ्रेण्ड मिळायलाही नशीब लागते. गर्लफ्रेण्ड बरोबर त्याला काय-काय मिळाले, या आहेत एका व्हिडिओवरील प्रतिक्रिया.
एका युवतीने प्रियकराला प्रपोज करताना बीएमडब्ल्यू मोटार व घर गिफ्ट दिले आहे. प्रियकराचा फक्त मला साथ हवी आहे, असे प्रेयसीने म्हटले आहे. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. संबंधित जोडपे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. शाओजींग आणि शाओक अशी त्यांची नावे आहेत.
Video: हॅलो, संजना बोलतेय; अन् तिथचं फसला...
शाओजींग आणि शाओकची एक वर्षापूर्वी एका मॉलमध्ये भेट झाली होती. त्यावेळी शाओकने शाओजींगला प्रपोज केले होते. एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे शाओजींग प्रियकराला मॉलमध्ये घेऊन गेली. प्रपोज केलेल्या ठिकाणी त्याला एक फुलांचा पुष्पगुच्छ भेट दिला. या पुष्पगुच्छामध्ये बीएमडब्ल्यू मोटारीची चावी होती. शिवाय, घरही त्याला भेट म्हणून दिले. यावेळी परिसर सजविण्यात आला होता. शिवाय, दोघांचे मित्रही उपस्थित होते.
शाओजींग म्हणाला, 'माझ्या प्रियकराने माझ्यासाठी जो त्याग केला आहे तो खूप खास आहे. मी, त्याला काय देऊ शकते असा विचार केला. त्यावेळी मी त्याला मोटार आणि घर भेट देण्याचे ठरवले. अर्थात, भेटवस्तू कुटुंबियांकडूनच घेतल्या आहेत. फक्त मला आयुष्यभर त्याची सोबत हवी आहे.'
पत्नी म्हणाली, तू फक्त नावाला नवरा म्हणून राहा...
दरम्यान, प्रेयसीने केलेल्या भन्नाट प्रपोजमुळे प्रियकर भावूक झाला. त्याने तिला विवाहासाठी होकार दिला. प्रेयसीने केलेल्या लग्नाच्या मागणीचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.