'संभाजीराजेंनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला, तर..' CM ठाकरेंचं मोठं वक्तव्य

संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम; शिवसेना, राष्ट्रवादीकडून पक्षात येण्यासाठी ऑफर
politics
politicsgoogle
Summary

संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम; शिवसेना, राष्ट्रवादीकडून पक्षात येण्यासाठी ऑफर

सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपानेही यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सध्या यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नावावरुन ही निवडणुक रंगणार असल्याची चर्चा आहे. संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम असून शिवसेना, राष्ट्रवादीकडून त्यांना पक्षात येण्यासाठी ऑफर येत आहेत. त्यामुळे अगामी काळात या निवडणुकीसाठी संभाजीराजे कोणती भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीला रंग चढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंच्या उमेदवारीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी हवी असल्यास त्यांनी हातात शिवबंधन बांधावे, मगच त्यांना उमेदवारी देऊ,' अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला, तर शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे किंवा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता संभाजीराजे कोणता निर्णय घेणार यावर त्यांची राजकीय वाटचाल ठरणार आहे.

politics
राज्यात प्रत्येक तासाला दोघांचा अपघाती मृत्यू! चिंताजनक माहिती

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संभाजी राजेंना ऑफर दिली. यावेळी ते म्हणाले, छत्रपती संभाजी राजे आमचे आहेत, त्यांच आणि आमचं नातं आहे, आम्ही त्यांना राज्यसभेसाठी शिवसेनेत येण्याची विनंती केली पण यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. राष्ट्रवादीनेही संभाजी राजेंना ऑफर दिली असून यामध्ये कुणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न नाही, जागा शिवसेनेची आहे, आम्हाला आमची जागा लढवायची आहे. राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्यावर छत्रपती संभाजीराजे ठाम आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

politics
इंधन दर कपातीवर शरद पवारांची चार शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

राज्यसभेच्या सहा जागांपैकी संख्याबळानुसार भाजपला दोन, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही राजकीय पक्षांना प्रत्येकी एक जागा निवडून आणता येणार आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. 'संभाजीराजे यांनी समर्थकांशी चर्चा करावी आणि आपला निर्णय कळवावा. यासाठी दोन दिवस वाट पाहू,' असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते. दुसरीकडे शिवसेनेसोबत असलेल्या आठ अपक्ष आमदारांनी बाहेरच्यांना उमेदवारी देण्याऐवजी शिवसेनेतीलच एखाद्या नेत्याला संधी मिळावी, अशी भूमिका मांडल्याचे समजते.

दरम्यान, कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी आपली 'स्वराज्य' नावाची स्वतंत्र संघटना स्थापन केली आहे. ही संघटना भविष्यात राजकारणातही येऊ शकते असं ते म्हणाले होते. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांची लोक एकत्र आणण्यासाठी त्यांनी ही संघटना स्थापन केली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

politics
नवी मुंबईत 'या' भागातील पाणीपुरवठा मंगळवारी राहणार बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com