मुख्यमंत्र्यांना अजून डिस्चार्ज नाही; संजय राऊत यांनी दिली प्रकृतीची माहितीं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज मिळेल असं म्हटलं जात होतं.

मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज नाही; राऊतांनी दिली प्रकृतीची माहिती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आठवड्याभरापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ते म्हणाले की, माझं रात्री त्यांच्याशी बोलणं झालं. ते लवकरच बरे होऊन घरी जातील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज मिळेल असं म्हटलं जात होतं. मात्र अद्याप ते रुग्णालयातच आहेत.

संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री लवकरच घरी परततील, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. आमच्या सगळ्यांचे, महाराष्ट्राचे नेते आहेत. आम्हाला असं वाटतं की, त्यांनी संपूर्ण बरं होऊन कामाला लागावं. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये. ज्या प्रकारची त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. तो नाजूक विषय असतो. कुठेतरी लहान सहान गोष्टीत कमतरता राहिली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.

हेही वाचा: 'अमेरिकेत होतं ते महाराष्ट्रात का नाही? CM यांचा कोणावर विश्वास नाहीये का?

उद्धव ठाकरे राज्याचे नेतृत्व करत आहेत. आम्हाला विश्वास आहे की ते लवकरात लवकर बरे होतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं. राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरही राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, संप मिटवण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे रात्रंदिवस चर्चा, बैठका घेतायत. मात्र काही संघटना आणि राजकीय पक्षांच्या भूमिकेमुळे यात अडथळा येत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

loading image
go to top