अमेरिकेत होतं ते महाराष्ट्रात का नाही? मुख्यमंत्र्यांचा कोणावर विश्वास नाहीये का? - नितेश राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

राज्याचे मुख्यमंत्री आठवड्याहून अधिक काळ रुग्णालयात आहेत.

'अमेरिकेत होतं ते महाराष्ट्रात का नाही? CM यांचा कोणावर विश्वास नाहीये का?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांची जबाबदारी १ तास २५ मिनिटांसाठी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्याकडे सोपवली होती. यावरून नितेश राणे यांनी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यो बायडेन यांनी उपचारासाठी गेल्यानंतर १ तास २५ मिनिटांसाठी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे कमला हॅरिस यांच्याकडे सोपवली होती. राज्याचे मुख्यमंत्री आठवड्याहून अधिक काळ रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर मान दुखण्याच्या त्रासामुळे शस्रक्रिया झाली आहे. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा: तुम्ही PM असाल देशाचे, मी इथला इनचार्ज; युकेच्या सभापतींनी सुनावले

ते म्हणतात, अमेरिकेत जर राष्ट्राध्यक्ष वैद्यकीय उपचार घेणार असल्याने त्यांची जबाबदारी ८५ मिनिटांसाठी उप राष्ट्राध्यक्षांकडे सोपवू शकतात तर महाराष्ट्रात हे का होऊ शकत नाही. मुख्यमंत्री बरे होईपर्यंत राज्याची सूत्रे इतरांकडे का देत नाहीत? कोणावर विश्वास नाहीये का? मी नाही तर कोणी नाही, मुख्यमंत्र्यांचं असं काही सुत्र ठरलं आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपा आणि महाविकास आघडीतील नेतेमंडळी राजकीय मुद्द्यांवरून टीका करत असतात. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अशी टीकाटिप्पणी सुरु असते. आता या कळीच्या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक चिमटा काढला आहे.

हेही वाचा: Video: नौदलाने दाखवली शक्तिशाली INS विशाखापट्टणमची खास झलक

loading image
go to top