कोरोनामुक्त झालेल्या गावातील सरपंचांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संवाद

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच कोरोनामुक्त गाव करण्यासाठी अतिशय चांगले काम करीत असून अशाच पद्धतीने यापुढेही काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या
Osmanabad
OsmanabadOsmanabad

उस्मानाबाद: राज्यात कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'कोरोनामुक्त गाव'ची हाक दिली होती. त्यानंतर राज्यात अनेक ग्रामपंचायती स्वतःचे गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच शासनाकडून कोरोनामुक्त झालेल्या गावांना विविध पुरस्कार तसेच जिल्हा प्रशासनाकडून बळ दिले जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिंगोली व तेर ही दोन गावे शंभर टक्के कोरोनामुक्त झाली आहेत. याच पाश्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गावकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.

शिंगोली व तेर कोरोनामुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी सर्व नियमांचे पालन केल्याने गावे कोरोनामुक्त झाली असं गावच्या सरपंचानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितले. राज्यातील सरपंचाशी झूम मिटिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (ता.११) रोजी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, शिंगोलीचे सरपंच येडबा शितोळे, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Osmanabad
तब्बल बारा वर्षांनंतर औरंगाबाद विमानतळाला पाणी मिळालं

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच कोरोनामुक्त गाव करण्यासाठी अतिशय चांगले काम करीत असून अशाच पद्धतीने यापुढेही काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच कोराना बाबत जनजागृती करण्यासाठी पारंपरिक कला असलेल्या वारली, वासुदेव, वाघ्या-मुरळी यांची देखील मदत घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, हे कोरोनाने नाहीतर आपण ठरविले पाहिजे. त्याला ठरवू द्यायचे नाही. प्रत्येकाने ठरवले तर तो गावात येणार नाही असे सांगून त्यांनी गावातील नागरिकांचे सरपंचांनी लसीकरण करण्यासाठी स्वतः प्रथम लसीकरण करून गावकऱ्यांना लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. गावच्या आरोग्यासाठी सरपंच जो आपलेपणा दाखवीत आहेत त्यामुळे सर्व सरपंचाचा मला अभिमान असल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरपंचांचे कौतुक केले.

यावेळी शिंगोलीचे सरपंच येडबा शितोळे व तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी म्हणाले की, आमची गावे शहराच्या जवळ असल्यामुळे शहरातून गावात येणाऱ्या व गावातून शहरात जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान जो व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला त्या व्यक्तीच्या घरासमोर इतर कोणत्याही व्यक्तीला दहा दिवस अजिबातच फिरकू दिले नाही. त्यामुळे आमची गावे कोरोनामुक्त झाली असल्याची माहिती शिंगोलीचे सरपंच येडबा शितोळे व तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना दिली.

Osmanabad
PHOTO: मराठवाड्यातील 'या' प्रसिद्ध पर्यटनस्थळांना एकदा तरी भेट दिलीच पाहिजे

लोकवर्गणी व ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे दहा दिवस कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना ठेवण्यात आले. ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण देखील ८५ टक्के करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केल्यामुळे चांगल्या पद्धतीने जनजागृती करुन या कोरोनावर यशस्वीपणे मात करण्यात यश आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com