शिवनेरीवरून उद्धव ठाकरे करणार कर्जमाफीची घोषणा?

वृत्तसंस्था
बुधवार, 11 डिसेंबर 2019

कर्जमाफीसाठी 60 हजार कोटींचा निधी

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर ते आता पहिल्यांदाच शिवनेरी गडावर जाणार आहेत. या गडावरूनच ते शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील, अशी शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास मी स्वत: शिवनेरीवर जाणार असून, कुलदैवत एकवीरा देवीचे दर्शन घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता उद्धव ठाकरे हा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्यापूर्वी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांना लवकरच भरीव मदत करण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार आहे, असे सांगितले. 

भाजप व्होट बँकेचे राजकारण करत नाही : अमित शहा

कर्जमाफीसाठी 60 हजार कोटींचा निधी

महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे 60 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Uddhav Thackeray may announces loan waiver from Shivneri