राज्यातील 7 जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करू नका; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

आरोग्य विभागाला सर्व जिल्ह्यांमध्ये उपाययोजना करण्याचे निर्देश
Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister Uddhav Thackeray
Summary

राज्याचा पॉझिटिव्हिटी दर हा 0.15 टक्के इतका आहे. मात्र या सात जिल्ह्यांमधील दर हा दुप्पट आणि तिप्पट आहे.

मुंबई : तज्ज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ही लाट थोवण्यासाठी योजना तयार करण्याचे आदेशही दिले. मुख्यमंत्र्यांची गुरुवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक पार पडली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) देखील उपस्थित होते. (CM Uddhav Thackeray orders Collectors to be prepared against third wave of corona)

कोकणातील रायगड, रत्नीगिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठावाड्यातील हिंगोली या जिल्ह्यांमध्ये संसर्ग अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे तिथले निर्बंध शिथिल करू नका असा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

राज्याचा पॉझिटिव्हिटी दर हा 0.15 टक्के इतका आहे. मात्र या सात जिल्ह्यांमधील दर हा दुप्पट आणि तिप्पट आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सांगितले.

"राज्याला संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लस या म्युटेट विषाणूचाही धोका आहे. यापार्श्वभूमीवर अधिकचे ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्स तसेच फिल्ड रुग्णालयांसारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागानं सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावं. सर्व जिल्ह्यांनी आत्तापासूनच ऑक्सिजनचा पुरेसा साठा करून ठेवावा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध करुन द्यावी. फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारण्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करा, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटची २१ केसेस

दरम्यान, बुधवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, "राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये म्युटेट 'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे २१ केसेस आढळून आली आहेत. ज्या रुग्णांमध्ये हा व्हेरियंट आढळून आला आहे त्यांना आयसोलेट करण्यात येत असून त्यांच्या प्रवासाची माहिती घेण्यात येत आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहितीही घेण्यात येत आहे. या रुग्णांचे नमुने आम्ही जिनोम सिक्वेंस तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप डेल्टा प्लस व्हेरियंटमुळं एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं होतं. या व्हेरियंटची लक्षण आणि त्यावरील उपचार सारखेच आहेत. लहान मुलांना या व्हेरियटंचा संसर्ग झालेला नाही, असंही त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं.

नव्या व्हेरियंट्सवर अभ्यास सुरु

दरम्यान, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडून (NIV) आता नवा व्हेरियंट लसीद्वारे निष्क्रीय होऊ शकतो का? याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com