esakal | रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करणार - मुख्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करणार - मुख्यमंत्री

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : अतीवृष्टीमुळे (heavy rainfall) अडचणीत आलेल्या रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना (mango production) दिलासा मिळण्यासाठी त्यांच्या पीक कर्जाचे (loan) पुनर्गठन करण्याबाबत शासन सकारात्मक (government) निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी येथे दिले.

हेही वाचा: उल्हासनगरच्या वृद्ध महिलेच्या घरात लाखोंचा खजाना; ऐवज पोलिसांच्या ताब्यात

अवकाळी पावसामुळे हे शेतकरी अडचणीत आले असल्याने त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मार्ग काढण्यात येईल. या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होण्यासाठी सहकार विभागाबरोबर बैठक घेऊन शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला कृषीमंत्री दादाजी भुसे, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे व त्यापूर्वीची चार वर्षे निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. तरीही कर्जवसुलीसाठी बँका तगादा लावीत आहेत. सन 2014-15 मधील अवकाळी पावसाच्यावेळी शासनाने या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे तीन महिन्यांचे व्याज माफ केले होते. पण ती रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा झाली नाही. पुनर्गठित कर्ज रकमेवरील पहिल्या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षाचे सहा टक्के प्रमाणे व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. शेतकऱ्यांकडून मात्र बँकांनी वसुली केली आहे. त्यामुळे पीककर्ज पुनर्गठन प्रक्रिया होणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी दाखवून दिले.

आंबा पिकावरील फवारल्या जाणाऱ्या कीटक नाशकाला जीएसटीमध्ये सवलत मिळण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. अवकाळी पाऊस पंधरा मे पर्यंत पडला तरच विमा रक्कम मिळते. पण कोकणातील आंबा हंगाम मे अखेरपर्यंत सुरु असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत नाही. त्यामुळे ही तारीखही 31 मे पर्यंत वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली.

loading image
go to top