esakal | उल्हासनगरच्या वृद्ध महिलेच्या घरात लाखोंचा खजाना; ऐवज पोलिसांच्या ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Ulhasnagar Treasury

उल्हासनगरच्या वृद्ध महिलेच्या घरात लाखोंचा खजाना; ऐवज पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर : गेल्या अनेक वर्षांपासून बेडवर (bedridden) असलेली, लॉकडाऊनमध्ये (lockdown) कुणी काही खाण्यास दिले तर त्यावरच गुजराण करून दिवस कंठीत करणारी उल्हासनगरातील (Ulhasnagar) 80 वर्षीय विधवा (widow grandmother) आजी ही चक्क लखपती (rich woman) निघाली आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी (vitthalwadi police) आजीच्या घरातील अलमारी (cupboard) उघडून बघितली असता त्यात मोदी सरकारने बंद केलेल्या जुन्या 500 रुपयांच्या नोटांचे (old 500 note) 85 हजाराचे बंडल मिळून आले असून बँक बॅलेन्सही लाखोंच्या घरात आहे.

हेही वाचा: जामीनाचे समर्थन करणाऱ्या आईला विशेष पौस्को न्यायालयाने फटकारले

सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय राहून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवणारे उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी यांना समाजसेवक पप्पू पमनानी यांनी फोन करून कळवले की,बॅरेक नंबर 1575 मध्ये एकट्याच राहणाऱ्या वयोवृद्ध आजी कौशल्या वाधवा यांचे घर पडत असून त्या खूप आजारी आहेत. त्यानुसार जगदीश तेजवानी, राजन चंद्रवंशी, रेशम बोनेजा,परमानंद गेरेजा हे आजीच्या घरी गेले.घरात मोठी अलमारी होती.आजीला रुग्णालयात न्यायचे पण चोरी वगैरे झाली तर,कुणी वाली नाही,कुणाची परवानगी घ्यावी असा विचार करून जगदीश तेजवानी यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठले.आणि सहायक पोलीस आयुक्त डी.डी.टेळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांना आजी बाबत सांगितल्यावर तेजवानी यांच्यासोबत उपनिरीक्षक आर.आर.पाटील यांच्यासोबत हवालदाराला पाठवण्यात आले.

प्रथम आजीला चहा देण्यात आल्यावर पोलिसांनी अलमारी उघडली.आणि त्यात जुन्या 500 रूपयांचे 85 हजाराचे बंडल,100 च्या नोटांचे बंडल,सोन्याच्या बांगळ्या,कुंडले,बँकेत 2 लाख रुपये आणि फिक्स डिपॉझिट 8 लाख असे घबाड बघून सर्वच चक्रावून गेले.पोलिसांनी पंचनामा करून हा सर्व ऐवज पोलीस ठाण्यात नेला. आजीला रुग्णालयात दाखल केल्यावर तिच्यावर उपचार करून तिला घरी सोडण्यात आले.आजीच्या विषयी जगदीश तेजवानी यांच्याशी विचारणा केली असता,कौशल्या वाधवा ह्या कामाला होत्या.त्यांचे पती हरपालसिंग वाधवा यांचे निधन झालेले आहे.त्यांना अपत्य नाही.हरपाल यांना कालांतराने दिसत नव्हते.त्यामुळे ते मंदिर,दरबारमध्ये भजन किर्तन करत होते.कौशल्या वाधवा यांना पुतण्या होता.त्याचेही निधन झाल्याने एकमेव वारस पुतण्याची पत्नी आहे.ती मुलुंड मध्ये राहत असून त्यांना आजी बाबत कळवण्यात आल्याची माहिती जगदीश तेजवानी यांनी दिली.

loading image
go to top