esakal | 'कोरोना लढ्यासाठी मास्क ही नवी ढाल'; CM उद्धव ठाकरेंनी दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray}

शिवनेरीवर कोरोनाकाळात खबरदारी म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे. यामुळे 100 पेक्षा जास्त लोकांना शिवजंयती निमित्त एकत्र येता येणार नाही.

maharashtra
'कोरोना लढ्यासाठी मास्क ही नवी ढाल'; CM उद्धव ठाकरेंनी दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा साजरा झाला. शिवनेरीवर उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासहित राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती देखील होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, शिवरायांच्या पुढे नतमस्तक व्हायला शिवजयंतीच पाहीजे असं नाही. शिवाजी महाराज कोणतेही पवित्र काम करायला आठवतातच कारण ते आमच्या धमन्यात आणि रक्तात आहेत. पुढे ते म्हणाले की, आत्ता सगळं छान आहे, पण तोंडावर मास्क आहे छत्रपतीनी लढा दिला तो आता सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना ठाऊक आहे. पण आता कोरोना सारखा दुष्मन आहे, त्यावर आपण मात करू. त्यासाठी मास्क ही आपली ढाल आहे. असं म्हणत त्यांनीकोरोनाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासंदर्भात भाष्य केलं. पुढे ते म्हणाले की, महाराजांना इंगित विद्या भाषा येत होती. ते डोळ्यांनी संकेत देत. अजित दादांना ती इंगितविद्या शास्त्र येते ती मी पण शिकणार आहे. कारण दादांच्या मनात काय चाललंय हे मला कळलं पाहिजे, असं त्यांनी मिश्किलपणे म्हटलं. 

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, कोरोनाचं संकट आणि जनतेचा जीवला धोका असल्याचं पाहून आपण काळजी घेत ही शिवजयंती साजरी करत आहोत. मागच्या वेळेस 23 रोची 50 लाखाचा निधी शिवनेरीसाठी मंजूर झाला. त्या निधीचं काम उत्तमपणे सुरु आहे. शिवजन्मस्थानासाठी या निधीचा वापर चांगल्या पद्धतीने व्हायला हवा. वेळेत काम पूर्ण झाला  पाहिजे तसेच दर्जा गुणवत्ता हवी, असं त्यांनी इथे काम करणाऱ्यांना तसेच देखरेख करण्याराना सांगितलं.

हेही वाचा - अखेर 18 वर्षांनी पुणे विद्यापीठाने रोल बॉलला स्वीकारले

शिवनेरीवर कोरोनाकाळात खबरदारी म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे. यामुळे 100 पेक्षा जास्त लोकांना शिवजंयती निमित्त एकत्र येता येणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं यंदा काही निर्बंध घातले आहेत. सरकारने 100 जणांनाच परवानगी दिली ही संख्या 300 ते 500 पर्यंत असती तर बंर झालं असतं अशी भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्ती केली.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडक नागरिक आणि मोजक्याच शिवभक्तांना प्रवेश दिला जात आहे. यासाठी पासेस दिलेल्यांनाच शिवनेरीवर जाता येणार आहे. दरम्यान, त्याआधी सकाळी साडेसातच्या सुमारास शासकीय पुजा शिवाई मंदिरात पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांनी ही पूजा केली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत जन्मसोहळा पार पडला.