रोजीरोटी बंद करायची नाही पण नियम पाळण्यात हलगर्जीपणा नको

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन
uddhav thackeray
uddhav thackeraysakal

मुंबई : "कोरोनाच्या विषाणूशी (Corona Variant) लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. (CM Uddhav Thackeray Speaks Corona Rules)

याचमुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग (Central Health Department) यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे. मी स्पष्ट करतो की, आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने मग तो समाजातला कुणीही घटक असो प्रत्येकानं आता ही लढाई अंतिम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com