मुस्लीम आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा; शनिवारी अयोध्या दौरा निश्चित

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 मार्च 2020

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाबाबत मंत्रिमंडळ समितीत चर्चा होईल, असे सांगत मुस्लीम आरक्षणाचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषित केले. ‘‘सात मार्चला मी अयोध्येत राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जातो आहोत. देवाला जाण्यावर कोणाचे बंधन कसे असेल, उलट ज्यांना ज्यांना आमच्याबरोबर यायचे असेल त्यांनी जरूर यावे,’’ असे ते म्हणाले.

मुंबई - महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाबाबत मंत्रिमंडळ समितीत चर्चा होईल, असे सांगत मुस्लीम आरक्षणाचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषित केले. ‘‘सात मार्चला मी अयोध्येत राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जातो आहोत. देवाला जाण्यावर कोणाचे बंधन कसे असेल, उलट ज्यांना ज्यांना आमच्याबरोबर यायचे असेल त्यांनी जरूर यावे,’’ असे ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देण्याची घोषणा नुकतीच केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज वेगळी भूमिका घेतली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही यासंबंधात निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. एनआरसी कायद्याबाबतही संयुक्त समितीत चर्चा होईल, मग भूमिका ठरेल असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

पुण्यातील रस्त्यांची कामे कालमर्यादेत; अशोक चव्हाण यांची माहिती

सभागृहात सांगावे 
महाविकास आघाडीतील त्रुटींवर प्रथम बोट ठेवणाऱ्या भाजपने आज याविषयावर आक्रमक धोरण घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना जे सांगितले ते त्यांनी अधिवेशनात सभागृहात बोलावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंत्री वेगळे बोलतात आणि मुख्यमंत्री वेगळे बोलतात, हा काय प्रकार आहे, असा सवालही त्यांनी केला. भाजप येत्या काही दिवसांत याबद्दल आक्रमक धोरण घेणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray statement about Muslim reservation Maharashtra