मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया यशस्वी; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत माहिती| CM Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया यशस्वी; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान दुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. तासभर ही शस्त्रक्रिया सुरु होती. डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली. तसंच असून भूल दिल्यानंतर पुढचे काही तास त्यांना विश्रांती घ्यावी लागणार होती. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉक्टर अजित देसाई हे हृदयरोग तज्ञ असून डॉ शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सकाळी ७:३० वाजता HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू झाली. वरिष्ठ आँर्थो सर्जन डॉक्टरांच्या टीमने सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी ८:४५ वाजता डॉक्टरांची टीम ऑपरेशन करून बाहेर आली आणि त्यांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

loading image
go to top