esakal | 'एनआरसी' हिंदूंच्याही मुळावर येणारा, महाराष्ट्रात लागू करणार नाही : उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

घटनेनुसार तिन्ही पक्षांच्या सह्या
घटनेनुसार आम्ही किमान समान कार्यक्रम बनविला आहे. त्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सह्या केल्या आहेत. महाविकासआघाडी भविष्यात पुढे जायला हरकत नाही. तिघांनीही मर्यादा ओळखल्या आहेत. 

'एनआरसी' हिंदूंच्याही मुळावर येणारा, महाराष्ट्रात लागू करणार नाही : उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सीएए म्हणजे कोणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही. एनआरसी हा कायदा फक्त मुस्लिमांपुरताच नाही, तर त्यामध्ये हिंदूही भरडला जाईल. हिंदूंच्या मुळावरही येणारा तो कायदा आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार संजय राऊत मुलाखत घेत असून, या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर आपली मते स्पष्ट केली आहेत. या मुलाखतीचा तिसरा भाग आज (बुधवार) प्रसिद्ध झाला. आजच्या भागात उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी, कोरेगाव भीमा, महाविकासआघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, की नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (सीएए) शेजारील देशातील अल्पसंख्य़ांकांना नागरिकत्व देणार आहे. तेथून येणाऱ्या नागरिकांची केंद्र सरकार कोठे सोय करणार आहे, याबाबत काहीच स्पष्ट केलेले नाही. आसाममध्ये 19 लाख नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करता आले नाही. त्यामध्ये 14 लाख हिंदू आहेत.

घटनेनुसार तिन्ही पक्षांच्या सह्या
घटनेनुसार आम्ही किमान समान कार्यक्रम बनविला आहे. त्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सह्या केल्या आहेत. महाविकासआघाडी भविष्यात पुढे जायला हरकत नाही. तिघांनीही मर्यादा ओळखल्या आहेत. 

केंद्राने राज्याला विचारायचे तरी होते
कोरेगाव-भीमा प्रकरणात केंद्राने तपासात करताना राज्याला विश्वासात घ्यायला हवे होते. राज्याच्या तपास यंत्रणेवर केंद्राचा विश्वास नाही का? केंद्राने झटपट निर्णय घेतला, ते गरजेचे होते. राज्याला किमान विचारायला तरी हवे होते. मी या तपासाकडे निःपक्षपातीपणे पाहतो. शरद पवारांचीही हीच भूमिका होती. पोलिस कोणाचे गुलाम असता कामा नये, त्यामुळे संबंधित यंत्रणेला त्यांनी विचारायले हवे होते.

यावर्षी वर्षावर नक्की जाईन
या वर्षात मी वर्षावर जाईल. मी प्रबोधरकारांचा नातू आहे. मी तिथे राहीन असे नाही, पण कामानिमित्त येत-जात राहील.