esakal | शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा प्रथमोपचार : उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

बुलेट ट्रेनविषयी चर्चा करणे गरजेचे
सरकारचे काम विकास करण्याचे आहे. आर्थिक स्थितीकडे पाहून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरविली पाहिजे. पांढरे हत्ती पोसणे योग्य नाही. बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, याविषयी चर्चा करणे गरजेचे आहे. 

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा प्रथमोपचार : उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आपण कृती करून दाखविली पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता असून, जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा प्रथमोपचार आहे. शेतकरी स्वतःच्या पायावर कसा उभा राहिला पाहिजे, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज (मंगळवार) प्रसारित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकार टाकला आहे. शेतकरी कर्जमुक्ती, बुलेट ट्रेन, उद्योगधंदे, मराठवाड्यातील पाणीप्रश्न यावर त्यांनी भाष्य केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, की शेतकऱ्यांना गोडाऊनसह अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. आम्ही काहीही निर्णय घेतला तरी विरोधी पक्ष बोंबलत बसणार आहे. दोन लाखांपर्यंत आम्ही शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. दोन महिने मी वेळ मागितला असून, एकही शेतकऱ्याने तक्रार केली आहे. मार्चपासून आम्ही दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती करणार आहोत. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठीही योजना आखण्यात आली आहे. 

केंद्राकडून येणाऱ्या पैशात दिरंगाई
कोल्हापूर, सांगली भागात आलेल्या पुरग्रस्तांना केंद्राकडून मिळालेली मदत अद्याप मिळालेली नाही. केंद्र सरकारकडून जीएसटीच्या रुपात येणारा परतावा अद्याप आला नाही. केंद्राकडून राज्याला येणाऱ्या पैशात दिरंगाई होत आहे. राज्यावर कर्जाचा बोजा मोठा असून, ते आव्हान आम्ही स्वीकारले आहे. राज्यातील आर्थिक निर्णयांबाबत श्वेतपत्रिका काढण्याचे काम सुरु आहे. आपल्या राज्यातील उद्योगपतींना विश्वासाने कोणी बोलले नव्हते. मी या सर्व उद्योगपतींना विश्वास दिला असून, त्यांच्या सर्व अडचणी सोडविण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. 

बुलेट ट्रेनविषयी चर्चा करणे गरजेचे
सरकारचे काम विकास करण्याचे आहे. आर्थिक स्थितीकडे पाहून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरविली पाहिजे. पांढरे हत्ती पोसणे योग्य नाही. बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, याविषयी चर्चा करणे गरजेचे आहे. 

मराठवाड्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निर्णय
मराठवाड्याच्या बैठकीत पाण्याचा प्रश्न माझ्यासमोर आला. पंकजा मुंडेंना त्यांनी मांडलेल्या प्रश्नाबद्दल मी तो मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या आहेत. विदर्भातही मी अशा बैठका घेतल्या आहेत. आता विविध भागातही बैठका घेणार आहे.