esakal | Coronavirus :...म्हणून मुख्यमंत्र्यांनी मानले नितीन गडकरींचे आभार 
sakal

बोलून बातमी शोधा

CM uddhav thackeray thanks to mr. nitin gadkari

आज (ता. २६) मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकत असताना त्यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपनेते नितीन गडकरींचे आभारनी मानले.

Coronavirus :...म्हणून मुख्यमंत्र्यांनी मानले नितीन गडकरींचे आभार 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे वाढत असताना केंद्र आणि सर्व राज्य सरकार या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आज (ता. २६) मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकत असताना त्यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपनेते नितीन गडकरींचे आभारनी मानले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ठाकरे म्हणाले, मला नितीन गडकरींचे मनापासून आभार मानायचे आहेत. सध्याच्या काळात जी गोष्ट महत्वाची आहे, तीच गोष्ट त्यांनी सांगितलं आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, आणि ते करण्याल मला रसही नाही. सरकार येतील-जातील. आज आम्ही सत्तापक्षात आहोत, उद्या कोणीतरी दुसरं असेल. पण सध्या आपापसताले मतभेद विसरुन एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. काही जणांकडून आजही राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय, पण मला त्यात अजिबात इच्छा नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

नितीन गडकरी यांनी सध्याची वेळ ही राजकारण करण्याची नाही तर संकटाशी लढण्याची आहे. यावेळी गडकरी यांनी राज्यातील भाजप नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या होत्या. यावरून मुख्यमंत्र्यांनी गडकरींचे आभार मानले आहेत. दरम्यान, यावेळी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी करोनामुळे मृत्यूमुखी पावलेल्या दोन पोलिस कॉन्स्टेबलबद्दलही शोक व्यक्त केला. तसेच, सध्याचा काळ बाहेर पडून वर्दळ करण्यासारखा नाही, त्यामुळे रमजानच्या काळात सर्व मुस्लिम बांधवानी घरात राहून प्रार्थना करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

loading image