esakal | अखेर ठरलं! उद्धव ठाकरे 'या' दिवशी अयोध्येला जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शरयू नदीवर आरतीदेखील करणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले असून, या वेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक अयोध्येला जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

अखेर ठरलं! उद्धव ठाकरे 'या' दिवशी अयोध्येला जाणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शरयू नदीवर आरतीदेखील करणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले असून, या वेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक अयोध्येला जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन राऊत यांनी केले आहे.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे शिवसेनेकडून वारंवार सांगितले जात होते, मात्र नेमके कधी जाणार याबाबतची स्पष्टता नव्हती. 28 नोव्हेंबर 2019 ला स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला येत्या 6 मार्चला 100 दिवस पूर्ण होत आहेत, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला रवाना होणार आहेत. याबाबत संजय राऊत यांनी आज ट्विट करत माहिती दिली आहे.