मुख्यमंत्र्यांचा एकच प्रश्न, अस मी काय केलं की ही बाळासाहेबांची शिवसेना नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM uddhav thackerays only question, What did I do that this is not Balasahebs Shiv Sena

मुख्यमंत्र्यांचा प्रश्न, अस मी काय केलं की ही बाळासाहेबांची शिवसेना नाही

मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना (Shiv Sena) राहिली नसल्याचे बोलले जात आहे. विविध आरोप केले जात आहे. शिवसेना पूर्वीसारखी राहिली नसल्याचे असे भासवले जात आहे. ‘अस मी काय केलं की ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही’ असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी विरोधकांसह सर्वांना केला. (CM uddhav thackerays only question, What did I do that this is not Balasahebs Shiv Sena)

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी (ता. २२) सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते कोरोना, शस्त्रक्रिया, राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलले.

हेही वाचा: मराठी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

२०१४ साली लढलेली शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना होती. आम्ही आमच्या ताकदीवर ६३ आमदार प्रतिकूल परिस्थितीत निवडून आणले. मधल्या काळात जे मिळाल ते बाळासाहेब नसताना बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिले आहे. आमदार, मंत्री हे सगळे बाळासाहेब ठाकरे नसतानाच्या शिवसेनेने (Shiv Sena) दिले आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले.

मी कोणाला भेटत नव्हतो. आमदारांना भेटत नव्हतो, असे सतत बोलले जात आहे. हे खरं आहे. कारण, माझ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्या काळात कोणाला भेटणे शक्य नव्हते. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. प्रकृतीच्या कारणाने आमदारांना भेटू शकलो नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून मी भेटायला सुरुवात केली आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले.

Web Title: Cm Uddhav Thackerays Only Question What Did I Do That This Is Not Balasahebs Shiv Sena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top