

Cold Wave to Continue in January
esakal
Weather Forecast : डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेली थंडीची लाट नव्या वर्षातही कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. जानेवारी २०२६ हा संपूर्ण महिना देशासह महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीचा राहणार असून, कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव आणखी तीव्र राहणार आहे.