विनोदवीर प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण! सिनेअभिनेता वीर पहाडियाच्या समर्थकांवर आरोप; पोलिस डायरीला नोंद, चौकशीला बोलावले

सिनेअभिनेता वीर पहाडिया यांच्यावर विनोद केल्याने सोलापुरात १० ते १२ जणांनी फोटो काढण्याच्या निमित्ताने जवळ येऊन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची पोस्ट विनोदवीर प्रणित मोरे याने इन्स्टाग्रामवर टाकली आहे. पोलिसांनी त्याची दखल घेत सदर बझार पोलिसांच्या डायरीला नोंद करण्यात आली आहे.
solapur city crime
solapur city crimesakal
Updated on

सोलापूर : सिनेअभिनेता वीर पहाडिया यांच्यावर विनोद केल्याने सोलापुरात १० ते १२ जणांनी फोटो काढण्याच्या निमित्ताने जवळ येऊन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची पोस्ट विनोदवीर प्रणित मोरे याने इन्स्टाग्रामवर टाकली आहे. पोलिसांनी त्याची दखल घेत सदर बझार पोलिसांच्या डायरीला नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यास चौकशी करुन फिर्याद देण्यासाठी बोलाविले आहे.

सात रस्ता परिसरातील हॉटेल २४-के क्राफ्ट ब्रेव्ज्‌ येथे एका कार्यक्रमासाठी विनोदवीर प्रणित मोरे २ फेब्रुवारीला सोलापुरात आला होता. त्यावेळी काहीजण त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आले आणि त्यांनी मारहाण केली, असे त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. सिनेअभिनेता वीर पहाडिया याच्यावर विनोद केल्याने हा प्रकार झाला आहे. पुन्हा वीर पहाडिया यांच्यावर विनोद केल्यास आणखी मार खाशील, असेही त्यातील लोक म्हणत होते, असेही त्याने म्हटले आहे. पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यावर तक्रार घेतली नसल्याचेही तो म्हणाला. पण, तो पोलिस ठाण्यात आलाच नव्हता असा दावा सदर बझार पोलिसांनी केला आहे.

दरम्यान, हा प्रकार समजल्यावर वीर पहाडिया यांनी देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ‘घडलेली घटना माहित झाल्यावर आपल्याला धक्का बसला, या प्रकाराशी आपला काहीही संबंध नसून आपण हिंसेचे समर्थन करत नाही. घडलेल्या प्रकाराबद्दल प्रणित व त्याच्या चाहत्याची माफी मागतो’ असेही त्या पोस्टमध्ये नमूद आहे. पोलिसांनी आता प्रणित मोरे यास फिर्याद द्यायला बोलावले असून त्याच्या फिर्यादीनंतर पुढील कारवाई केली जाईल. आमची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com