esakal | राज्यात पुढच्या 5 दिवसांत अतिमुसळधार; हवामान खात्याचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात पुढच्या 5 दिवसांत अतिमुसळधार; हवामान खात्याचा इशारा

राज्यात पुढच्या 5 दिवसांत अतिमुसळधार; हवामान खात्याचा इशारा

sakal_logo
By
स्नेहल कदम

रत्नागिरी : अनेक दिवसांत उघडीप दिलेल्या पावसाने ( heavy rain) आता राज्यात पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. प्रामुख्याने घाट प्रदेशासह कोकण (kokan) आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा (marathvada) प्रदेशात पावसाची संततधार सुरु आहे. गेले काही दिवस या भागात मुसळधार पाऊस सुरु असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक भागात नद्यांना पूर आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात (maharashtra) सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु आहे. आता भारतीय हवामान खात्याने (Indian Metrology Department) पुढचे पाच दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याने आजपासून पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार (heavy rain in maharashtra) पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये कोकण, मध्यमहाराष्ट्रासह, मुंबई अशा विविध भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रदेशातील लोकांना स्थानिक प्रशासनाने सर्तकतेचा इशार दिला आहे.

हेही वाचा: खडसेंची चौकशी केलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ

गेले काही दिवस कोकणासह, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची संततधार सुरु आहे. या भागातील अनेक नद्यांना पूर आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात पाऊस असल्याने अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोकणातील नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक ठिकाणी ओढे-नाल्यांचे पाणी शेतात घुसून अनेकांच्या खरीप पिकाचे नुकसान झाले आहे.

loading image