‘पुणे अभियांत्रिकी’साठी समिती स्थापन - सामंत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

मंत्रालयात पुणे स्वायत्त संस्थेच्या प्रगतीबाबत व अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या संस्थेस महाराष्ट्र विधानमंडळाकडून अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे कायदा २०२० द्वारे विशेष दर्जा बहाल करण्याबाबत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. सामंत म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालयामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणे आवश्‍यक आहे.

मुंबई - पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती स्थापना करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे गुरुवारी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंत्रालयात पुणे स्वायत्त संस्थेच्या प्रगतीबाबत व अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या संस्थेस महाराष्ट्र विधानमंडळाकडून अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे कायदा २०२० द्वारे विशेष दर्जा बहाल करण्याबाबत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. सामंत म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालयामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. याबाबतच्या सर्व अडचणींचा अभ्यास करून शिफारस करावी. या शिफारसीनुसार सरकार विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेईल.’’ बैठकीला ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, प्रा. धांडे, प्रा. पासलकर, कमांडर खांडेकर, विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’साठी ऑनलाइन नावनोंदणी; शनिवारी पुण्यात ऑडिशन्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Committee Establishment for Pune Engineering uday samant