विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीत रस्सीखेच; पेच कायम

वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

नव्या संभाव्य सरकारमधील इतर विभागांचे खातेवाटप, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष याबाबत तिन्ही पक्षांत तोडगा निघालेला नाही. विधानसभा अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. आजच्या अडीच तासांच्या बैठकीत यावर सखोल चर्चा झालेली असली, तरी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सहमती झालेली नसल्याचे चित्र आहे.

मुंबई : नव्या संभाव्य सरकारमधील इतर विभागांचे खातेवाटप, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष याबाबत तिन्ही पक्षांत तोडगा निघालेला नाही. विधानसभा अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. आजच्या अडीच तासांच्या बैठकीत यावर सखोल चर्चा झालेली असली, तरी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सहमती झालेली नसल्याचे चित्र आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

उद्या परत तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसणार असून, सत्तावाटपाच्या सूत्रावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले असले तरी दोन्ही पक्षात विधानसभा अध्यक्षपदांवरून रस्सीखेच सुरु असल्याचे स्पष्ट आहे.

उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सुचविलेल्या 'या' नावांना पवारांची नापसंती

दरम्यान, आता सत्तेचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात असून मुख्यमंत्रिपद स्वतः स्वीकारण्यावर उद्धव यांचा निर्णय झालेला नाही. राज्यात शिवसेना - राष्ट्रवादी - कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे ठरलेले असले, तरी सत्तावाटपाचा पेच मात्र कायम असल्याने सत्तास्थापनेचा दावा लांबणीवर पडणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

शरद पवार म्हणालेत मुख्यमंत्रिपदासाठी 'यांच्या' नावावर झाली सहमती

आज (ता.22) वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. यामध्ये, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वांचीच सहमती झाली असून, शिवसेनेने मात्र याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सहमती झाल्याचे शरद पवार यांनी बैठकीनंतर जाहीर केले. पण मुख्यमंत्रिपद स्वतः स्वीकारायचे का नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी अद्याप घेतलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Competition In NCP and Congress for the POst of Speaker of Assembly