esakal | उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सुचविलेल्या 'या' नावांना पवारांची नापसंती
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Suggest Eknath Shinde And subhash desai name For Cm Post

शिवसेना पक्षप्रुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सुचविलेल्या एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांचा नावांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नापसंती दाखवली असल्याची माहिती समोर येत आहे. 

उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सुचविलेल्या 'या' नावांना पवारांची नापसंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना पक्षप्रुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सुचविलेल्या एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांचा नावांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नापसंती दाखवली असल्याची माहिती समोर येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रात सत्तापेच कायम असताना महाविकासआघाडीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अनुत्तरित असताना महाविकासआघाडीच्या संयुक्त बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांची पसंती ही उद्धव ठाकरे यांनाच होती. मात्र, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी अनुकुल नव्हते अशात त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव समोर केले त्यांच्या नावालाही पवारांनी नापसंती दर्शविली त्यानंतर, उद्धव यांनी सुभाष देसाई यांचे नाव समोर केले मात्र, पवारांकडून या नावालाही विरोध झाला. त्यानंतर मात्र, पवारांनी संजय राऊत यांचे नाव सुचविले मात्र, या नावाला उद्धव यांनीच विरोध केला असल्याची माहिती समोर येत आहे.

का होतोय मंदाताई आणि प्रकाश आमटेंचा फोटो व्हायरल?

दरम्यान, राज्यात मोठ्या सत्ता पेचानंतर महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पवारांची यामध्ये मोठी भूमिका राहिली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयोगातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सरकार स्थापन होणार आहे. तसेच, उद्धव ठाकरे हेही मुख्यमंत्री होणार असल्याचे आता जवळपास निश्चित आहे. 

मुलीच्या लग्नाच्या दिवशीच मुलाचा मृत्यू; तरीही वडिलांनी...

महाविकासआघाडीची उद्या (ता.23) आणखी एक महत्वाची बैठक होणार असून त्यानंतर महाविकासआघाडी एकत्रितपणे राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नावावर बैठकीत एकमताने मंजुरी झाली असली तरी मुख्यमंत्री व्हायचे की नाही हा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत.