Palghar News: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेता हरपला! ज्येष्ठ नेते कॉम्रेड लहानू कोम यांचे निधन

Comrade Lahanu Kom: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार व माजी आमदार कॉम्रेड लहानू कोम यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते गेले १० दिवस एका खासगी इस्पितळात आय.सी.यू. मध्ये होते.
Comrade Lahanu Kom passed away
Comrade Lahanu Kom passed awayESakal
Updated on

विरार (बातमीदार) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १९५९ पासूनचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते, पक्षाचे माजी राज्य सचिवमंडळ सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य उपाध्यक्ष, माजी खासदार, माजी आमदार कॉम्रेड लहानू कोम यांचे आज पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. यांनी आजवर लाखो आदिवासी मुलामुलींना गेली सहा दशके शिक्षण देणाऱ्या आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेचे १९६२ पासूनचे अध्यक्ष होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com