मुंबई - अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अल्पसंख्याक, संस्थांतर्गत आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाच्या शून्य फेरीची यादी बुधवारी (ता. ११) मध्यरात्री उशिरा जाहीर करण्यात आली. त्यात असंख्य विद्यार्थ्यांना याची माहितीच न मिळाल्याने आज या फेरीत सहभागी झालेल्या एक लाख १३ हजार ४८ विद्यार्थ्यांपैकी केवळ नऊ हजार ८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्ण केले.