esakal | कोरोना मृतांच्या कुटुंबियांच्या मदतीची संभ्रमावस्था संपली! राज्य सरकार करणार अधिकृत घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

कोरोना मृतांच्या कुटुंबियांच्या मदतीची संभ्रमावस्था संपली!

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : कोरोना महामारीत (coronavirus) मरण पावलेल्या मृतांच्या कुटुंबियांच्या मदतीविषयीची (help for family) संभ्रमावस्था संपली आहे. राज्य शासनाची (maharashtra government) मृतांच्या कुटुंबाला (corona death) मदतीची कोणत्याही क्षणी अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती मिळत आहे. किती मदत मिळणार...वाचा पुढे...

मदतीविषयी सोशल मिडियावर संभ्रमावस्था

कोरोनातील मृतांच्या मदतीविषयी सोशल मिडियावर बरेच संदेश फिरत होते. सुरुवातीला केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपये देण्याबाबतचे संदेश फिरले. तर राज्य शासनाकडून मात्र त्याविषयी कुठलीही घोषणा होत नव्हती. दोन्ही पालक गमावलेले अशा मुलांच्या नावावर पैसे बॅकेत ठेवण्याचा निर्णय महिला बाल कल्याण समितीतर्फे घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय केवळ दोन्ही पालक गमावले आहे. अशा पाल्य किंवा कुटुंबापुरतीच हा मदतीचा विषय होता.राज्य शासनाने कोरोना मृतांच्या कुटुंबांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील १ लाख ३९ हजार तर जिल्ह्यातील ८६४२ कोरोना मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीची कोणत्याही क्षणी घोषणा होउ शकते. कोरोना महामारीत मरण आलेल्यांच्या मदतीबाबत जूनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश केला होता. त्यानंतर राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याविषयी घोषणेची तयारी सुरु आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र: पूरग्रस्तांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य जाहीर

राज्यात १ लाख ३९ हजारावर मृतांच्या कुटुबांना मदत

सोशल मिडियावरील संदेशानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे मदतीसाठी लोकांच्या रांगा होत्या. एकट्या नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाकडे आठराशेहून आधीक मदतीसाठी अर्ज आले. मृतांच्या कुटुंबाला ४ लाख रुपये मिळावेत यासाठीच्या अर्जाचे प्राधीकरणाकडे अक्षरश गठ्ठे बांधून होते. मात्र शासनाकडून कुठल्या मार्गदर्शक सुचना किंवा आदेशच नसल्याने जिल्हा यंत्रणेकडून काहीही उत्तर मिळत नव्हते. नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयात ठिकठिकाणी कात्रणही लावण्यात आली.

कोरोना मृतांची स्थिती

             एकुण  पॉझीटीव्ह        बरे झाले         मृत्यू        

नाशिक        ४०९१७८                ३९९७००         ८६४२

महाराष्ट्र      ६५७७८७२               ६४०१२८७      १,३९,५४२

हेही वाचा: एनसीबी, सीबीआय आणि ईडीचा भाजप वापर करतेय - शरद पवार

loading image
go to top