Sharad Pawar Resigns : 'हा निर्णय न पटणारा, ...तर राष्ट्रवादीचं मोठं नुकसान होणार'; काँग्रेस नेत्याचं विधान

Ashok Chavan
Ashok ChavanSakal

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ केला असून हा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली. तर छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे यांच्या सारख्या बड्या नेत्यांना यावेळी अश्रू अनावर झाले आहेत. यानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Ashok Chavan
शरद पवारांची निवृत्तीची घोषणा, कार्यकर्त्यांचा गोंधळ; अजित पवार काय म्हणाले? | Sharad Pawar Resign

"काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. पण सध्या राज्यात चाललेलं राजकारण बघता शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करणे हे कुठेतरी खटकते. पण त्यांच्या पक्षाचा हा अंतर्गत पक्ष आहे. केंद्र पातळीवर सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधात मोठी फळी तयार करत असताना शरद पवारांचा असा निर्णय न पटणारा आहे." असं अशोक चव्हाण म्हणाले.

Ashok Chavan
Sharad Pawar Resigns : 'तुमचा राजीनामा आम्ही नामंजूर करतो'; शरद पवारांच्या निवृत्तीवर छगन भुजबळांची घोषणा

"अनुभवी नेता जर बाहेर पडला तर नुकसान होईल म्हणून पक्षात त्याचं राहणं गरजेचं आहे. त्या समितीने शरद पवारांना पुन्हा पक्षात राहण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी विनंती आहे. पण हा त्यांचा अंतर्गत विषय आहे." असं मत काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

Ashok Chavan
पवारांची निवृत्तीची घोषणा अन् नेत्यांच्या डोळ्यात पाणी; भावूक वातावरणातील Photo | Sharad Pawar Resigns

दरम्यान, शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेले "लोक माझे सांगाती" या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचीही त्यांनी घोषणा केली. त्यांच्या या मोठ्या निर्णयानंतर चर्चा सुरू झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com