Ashok Chavan : भारत जोडो यात्रेत लेकीचं लाँचिंग; चव्हाणांची मुलगी श्रीजा राहुल गांधींसोबत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Chavan Daughter with Rahul Gandhi
Ashok Chavan : भारत जोडो यात्रेत लेकीचं लाँचिंग; चव्हाणांची मुलगी श्रीजा राहुल गांधींसोबत

Ashok Chavan : भारत जोडो यात्रेत लेकीचं लाँचिंग; चव्हाणांची मुलगी श्रीजा राहुल गांधींसोबत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात पोहोचली आहे. पुढचे १४ दिवस यात्रेचा मुक्काम महाराष्ट्रातच असणार आहे. सध्या नांदेडमध्ये असलेल्या या यात्रेत आणखी एका व्यक्तीने लक्ष वेधलं ते म्हणजे श्रीजा चव्हाण. कोण आहेत श्रीजा चव्हाण? जाणून घ्या....

हेही वाचा: Nanded : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेत्याचं निधन

श्रीजा चव्हाण या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मुलगी आहे. अद्याप त्या राजकारणापासून दूर होत्या. मात्र भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने त्यांचं राजकारणात लाँचिंग होत असल्याचं दिसत आहे. भारत जोडो यात्रेच्या पोस्टर्समध्ये श्रीजा चव्हाण यांचा फोटो दिसला होता. त्यानंतर आता त्या राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेमध्ये दिसल्या.

हेही वाचा - कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

हेही वाचा: EWS Reservation : "Tweet करणाऱ्याला काढून टाका"; आरक्षणाचं स्वागत करताच CM एकनाथ शिंदे ट्रोल

हातात मशाली घेत हजारो काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते. राहुल गांधींचं महाराष्ट्रात फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत झालं. त्यानंतर राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं. आता आज पुन्हा ही यात्रा आणखी पुढे सरकली आहे.