काँग्रेसला मोठा झटका; स्पष्ट बहुमत असूनही गमावली सत्ता

congress defeat in bhiwandi mayor election
congress defeat in bhiwandi mayor election

मुंबई : भिवंडीमध्ये राजकारणाचा एक नवीन पॅटर्न पाहायला मिळाला. भिवंडीच्या महापौरपदी कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. बंडखोर नगरसेवकांमुळे कॉंग्रेसकडे आलेल्या एकहाती सत्तेचे तीनतेरा वाजलेत. महापौर निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल 18 नगरसेवक फुटल्याने  कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. बहुमतानं निवडून येणारे विरोधात आणि अल्पमतातले सत्तेत असंही इथं होतं. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग असाच होता आणि आता असाच काहीसा प्रकार भिवंडीतही घडला आहे. भिवंडीत अवघ्या 4 नगरसेवकांच्या कोणार्क विकास आघाडीला महापौरपद मिळालंय. विशेष म्हणजे स्पष्ट बहुमत असलेल्या काँग्रेसचा पालिकेत पराभव झालाय. प्रतिभा पाटिल यांना एकूण 49 मतं मिळाली तर विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या रिषिका राका यांना 41 मतं मिळाली. काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटल्यानं भिवंडीमध्ये ही उलथापालथ झालीये.  कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील महापौर झाल्या आहेत.

विधानभवनात येण्यापासून मलाच रोखले; राज्यपालांचा आरोप

भिवंडी महापालिकेत आधी काँग्रेसचे जावेद दळवी हे महापौर तर सेनेचे मनोज काटेकर उपमहापौर होते. मात्र इथलं महापौरपद खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव झालं आणि इथंच घोडाबाजाराला सुरुवात झाली.

भिवंडी महापालिकेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस – 47
शिवसेना – 12
भाजप – 20
कोणार्क विकास आघाडी – 4
समाजवादी पार्टी – 2
आरपीआय (एकतावादी)- 4
अपक्ष – 1

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com