esakal | पेगॅसस प्रकरणाची SCच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी - काँग्रेस
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

पेगॅसस प्रकरणाची SCच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी - काँग्रेस

sakal_logo
By
अमित उजागरे

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत याची चौकशी व्हावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच यासाठी उद्या (गुरुवार) याप्रकरणी राजभवनाबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (Congress demands SC judges investigate Pegasus matter Nana Patole aau85)

पटोले म्हणाले, पेगॅसस हेरगिरी प्रकरणातील सत्य जनतेसमोर यावं यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत याची चौकशी व्हावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. याप्रकरणात राष्ट्रपतींनी लक्ष घालावं या मागणीसाठी उद्या राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनाबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पालिका निवडणुका स्वबळावर लढण्यास राहुल गांधींचा हिरवा कंदील

दरम्यान, नाना पटोले यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी राहुल गांधींनी संमती दिल्याचं पत्रकारांशी बोलताना जाहीर केलं. यामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक काँग्रेस आता स्वबळावर लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच नाना पटोले यांनी औरंगाबादसह, मुंबई, नागपूरमध्ये रॅली काढणार असल्याचंही यावेळी जाहीर केलं.

loading image