Balasaheb Thorat : राज ठाकरेंमध्ये 'तो' लढाऊबाणा राहिलेला नाही; काँग्रेसची बोचरी टीका

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी वाढल्या आहेत.
Raj Thackeray bjp
Raj Thackeray bjpSakal

Balasaheb Thorat Attack On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसेमध्ये युती होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रसेचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आगामी काळात भाजप आणि मनसे यांच्यात युती होऊ शकते. मात्र, आम्ही ज्या राज ठाकरेंना ऐकले आणि पाहिले आहे तो लढाऊबाणा आताच्या राज ठाकरेंमध्ये राहिलेला नसल्याचं थोरात यांनी म्हटले आहे. थोरातांच्या या टीकेला मनसेकडून कोणत्या भाषेत प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Raj Thackeray bjp
महाराष्ट्र हास्यजत्रेची वाट पाहातोय; सेनेला दसरा मेळाव्याची परवानगी द्या

मुंबई महापालिकेसह राज्याच्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट घेत चर्चा केली. मात्र, या सर्वभेटींदरम्यान राज यांच्या घरी दिलेली भेट सदिच्छा भेट असल्याचे शिंदे आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, जरी आता गणपती दर्शनाचे कारण पुढे करत हे दोन्ही नेते मनसे आणि भाजपच्या युतीबाबत उघडपणे बोलणे टाळत असले तरी, मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू असल्याचे अंदाज बांधले जात आहे.

Raj Thackeray bjp
एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र, बारामतीकर...; भाजपच्या मिशनवर खडाजंगी सुरू

भाजपच्या रणनीतवर जोरदार हल्लाबोल

यावेळी थोरातांनी भाजपच्या सध्याच्या रणनीतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, काहीही करा पण सत्ता आणा हेच भाजपचं सद्याचं धोरण आहे. याचा अनुभव नुकताच अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याती भाषणातूनही दिसून आले आहे. मात्र, सत्तेपासून भाजपला रोखण्याचे प्रयत्न मविआच्या माध्यामातून सुरूच राहिलं असे थोरातांनी स्पष्ट केले आहे. मविआ आजही एकत्रच असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com