esakal | सोनियांसोबतची बैठक संपवून काँग्रेस नेते पवारांच्या घरी; काय होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Congress leader meets Sharad pawar after meet sonia Gandhi

काँग्रेस नेत्यांसोबत सुरु असलेली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक संपली आहे. बैठक संपल्यानंतर काँग्रेस नेते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या घरी दाखल झाले आहेत. आता आघाडीची पुढील चर्चा पवारांच्या घरी होणार आहे. या चर्चेनंतर तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोनियांसोबतची बैठक संपवून काँग्रेस नेते पवारांच्या घरी; काय होणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्यांसोबत सुरु असलेली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक संपली आहे. बैठक संपल्यानंतर काँग्रेस नेते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या घरी दाखल झाले आहेत. आता आघाडीची पुढील चर्चा पवारांच्या घरी होणार आहे. या चर्चेनंतर तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार असे बोलले जात आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यालयात बैठक घेतली असून या बैठकीला के. सी. वेणूगोपाल, मल्लिकार्जुन खरगे,अहमद पटेल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान आदी नेते उपस्थित होते.
 

सत्तास्थापनेचा पेच कायम; स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी वेळ

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांपेक्षा अधिक (29 दिवस) कालावधी लोटला असला, तरी सरकार स्थापन झालेले नाही. सरकार स्थापनेसाठी डिसेंबर महिना उजाडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सत्ता स्थापनेसाठी 21 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे.