Maharashtra Politics : बंड फसणार! अजित पवारांसह सर्व मंत्री…; काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

ajit pawar ncp
ajit pawar ncpesakal

अजित पवार याच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकराल पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. मात्र राष्ट्रावादीतल किती आमदार अजित पवारांच्या पाठिशी आहेत हे अद्यापही निश्चित झालेलं नाहीये. यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांच्या गटाकडे दोन-तृतीयांश इतक्या सदस्यसंख्येसाठी आवश्यक असणारा ३६ आमदारांचा आकडा नाही. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार, अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे सर्व मंत्री निलंबित होतील, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणयांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवार गटातील बंडखोर अडचणीत सापडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ajit pawar ncp
Maharashtra Politics : राष्ट्रवादी नंतर आता काँग्रेसमध्ये राजकीय भुकंप! अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा दावा

महाराष्ट्रात्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाकडे म्हणजेच अजित पवार यांच्याकडे ३६ आमदार नाहीत. अजूनपर्यंत त्यांच्याकडे ३६ आमदार दिसले नाहीत. अजित पवार यांच्याकडे ३६ आमदार असते तर त्यांनी प्रदर्शन केलं असतं. त्यांचा फोटो देखील काढला असता. त्यामुळे त्यांच्याकडे दोन-तृतीयांश आमदार नसतील, तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होईल.

तसेच ज्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, ते सर्व आमदार निलंबित होतील. त्यांचं सदस्यत्व रद्द होईल. सदस्यत्व रद्द झाल्यानंतर संबंधित आमदारांना विद्यमान विधीमंडळात मंत्री होता येणार नाही. ही अतिशय गंभीर बाब असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

ajit pawar ncp
Ajit Pawar News : अजित पवारांना मिळणार अर्थ खातं? शिंदे गटातील नेत्याने स्पष्टच सांगितलं…

इतकेच नाही तर अजित पवार यांच्यासह आमदार निलंबित होणार नसतील, तर त्यांच्याकडील ३६ आमदारांचा आकडा त्यांनी दाखवावा. हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न नाही, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे, विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहे? हा संपूर्ण पक्षपातीपणा आहे असेही चव्हाण म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com