Ajit Pawar News : अजित पवारांना मिळणार अर्थ खातं? शिंदे गटातील नेत्याने स्पष्टच सांगितलं…

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार यांच्यासह आणखी ८ नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. दरम्यान अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं मात्र, त्यांना अद्याप मंत्रिमंडळात कोणतंही खातं दिलं नाही. आता त्यांना अर्थखाते अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. यादरम्यान शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतेच सत्तेत सहभागी झालेले अजित पवार यांना अर्थमंत्रीपदाची जबाबदार मिळणार असल्याच्या चर्चेवर बोलानाना शंभूराजे देसाई म्हणाले की, अर्थाखात्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असेल आणि तो निर्णय जो काही असेल तो आम्हाला मान्य आहे असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

Ajit Pawar
Bhujbal On Sharad Pawar : तुम्ही ज्यांना सांभाळलं ते अजित पवार तर…; छगन भुजबळांचा पुन्हा पवारांवर घाव

मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत निधी वाटपावरून वाद होते. आता अर्थमंत्रीपदचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी देण्याबाबत बोलातना शंभूराजे देसाई म्हणले की, तेव्हाची प्रश्वभूमी वेगळी होती आताची प्रश्वभूमी वेगळी आहे. तेव्हा जे अजित पवार यांनी केले तेच आता होईल असं नाही. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेव्हा आम्ही अनेक गोष्टी सांगायचो पण ऐकलं जायचं नाही.आता मुख्यमंत्री एकनारह शिंदे आमचं ऐकतात असं शंभूराजे गेलाई म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, आम्ही त्यावेळी नेहमी सांगायचो कि आपण जिल्ह्यात जायला पाहिजे, पण तेव्हा कोरोनाचा उल्लेख केला गेला, करणे दिली गेली आणि आता धर्माभिमानी असे बॅनर लागले आहेत. सत्तेसाठी युती का तोडली? हिंदुत्वाच्या युती का तोडली? ज्यांना बरोबर घेणार नाही कि त्यांच्यासोबत जाणार नाही असं बाळासाहेब बोलले त्यांच्यासोबत हे गेले.

Ajit Pawar
Sharad Pawar News : वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसलाच नाही! शालिनीताईंचा युटर्न; पवारांच्या मदतीला धावल्या…

चर्चा का सुरू झाली?

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यासाठी उपसमिती नेमण्यात आली आहे. या संबधीचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकावर समितीचे अध्यक्ष ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. समितीच्या इतर सदस्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार(वने), उदय सामंत (उद्योग), अतुल सावे (सहकार) या मंत्र्यांची नावे आहेत. तर वित्त मंत्री या समोर कोणतंही नाव लिहण्यात आलेलं नाही. (Latest Marathi News)

हे खाते सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून त्या ठिकाणी नाव लिहिण्यात आलेले नाही. त्यामुळे वित्त खाते हे अजित पवार गटाकडे आहे का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com